गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास गेलेल्या बेटगेरी ता. खानापूर येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. सागर गुरव आणि ओंकार सुतार अशी त्यांची नावे आहेत.
जांबोटी भागातील बेटगीरी ता खानापूर या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यासाठी तलावात गेलेल्या सागर पांडुरंग गुरव वय 16 व ओमकार रामलींग सुतार वय 22 दोघा तरूणांचा बुडून मृत्यू झाला असून बेटगीरी गावावर शोककळा पसरली आहे .
याची माहिती मीळताच माजी आमदार अरविंद पाटील यानी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली सदर कुटुंबाचे सात्वन केलं. मयत युवकांचे मृत देह घेऊन खानापूर शासकीय दवाखान्यात आणले आहेत.
सदर घटनेच्या वेळी दोघाचे आई वडील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समोरच ही घटना घडली आहे त्यानी त्याना वाचवण्यासाठी साडी टाकली खर एकमेकाना वाचवण्याच्या प्रयत्नात ते बुडाले दोघानाही चांगले पोहता येत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.