ट्रक दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे.न्यु गांधी नगर ब्रिज जवळ हा अपघात झाला होता.
रहदारी उत्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यु गांधी नगर ब्रिज कडून सांबरा कडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून संतोष मत्तीकल्लमनावर वय 35 रा.बस्तवाड (हलगा)असे मयत युवकाचे नाव आहे.
मालवाहू ट्रक आणि दुचाकीस्वार संतोष दोघेही ऍक्टिवा गाडी चालवत ब्रीज न्यु गांधीनगर ब्रिज सर्व्हिस रस्त्यावरून पुढे जात होते त्यावेळी हा अपघात झाला आहे.
दुचाकी स्वार डाव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करत असताना अपघात झाल्यास ट्रक चालकाचे म्हणणे आहे अशी माहिती पोलिसांनी बेळगाव live कडे बोलताना दिली याबाबत अजून तपास सुरू आहे.रहदारी उत्तर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.