पूरग्रस्तांना मदत करण्यात केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे मंगळवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.पण त्या बाबतची वेळ मात्र कळविण्यात आलेली नाही.
काँग्रेस पक्षाची रॅली संगोळी रायण्णा चौकातून सुरू होणार असून राणी चन्नमा चौकात समारोप होणार आहे.ठळकवाडी,शहापुरकडून येणारी वाहने कॅम्प मधून जावून डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरून बाहेर पडणार आहेत.
कृष्णदेवराय सर्कल पासून आर टी ओ सर्कलकडे येणारी वाहने पोलीस भवन न्याय मार्ग,अशोक नगर या मार्गावरून जातील.
कृष्णदेवराय सर्कलकडून राणी चन्नमा सर्कलकडे जाणारी वाहने सदाशिव नगर लक्ष्मी कॉम्प्लेक्स मार्गावरून जातील.काँग्रेसच्या या रॅलीत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या सह अनेक माजी मंत्री जेष्ठ काँग्रेस नेते आमदार उपस्थित राहणार आहेत.