वाहतुकीची कोणतीच साधने नसल्याने आधीच त्रासात असलेल्या हेम्माडगा परिसरातील नागरिकांना वाघाचा वावर आणि धोका घेऊन जगावे लागत आहे.अनेक किलोमीटर चालून शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा धोका जास्तच आहे.
मागील 45 दिवसात वाघाने या भागातील 15 पाळीव जनावरे फस्त केली आहेत. नागरिकांना हा वाघच असल्याचा संशय आहे तसेच वन विभागानेही तो बिबट्या असल्याचा दुजोरा दिला आहे.
हेम्माडगा, पाली, अनमोड आणि परिसरातील नागरिकांनी परिवहन मंडळाकडे बस सुरू करण्याची मागणी केली. जोर पावसात रस्ता खचल्याने बस सेवा बंद आहे.
पी डब्ल्यू डी ने हा रस्ता दुरुस्त केला तरीही बस सुरू केली नाही. परिवहन ला हा रस्ता वाहतुकीस योग्य वाटत नाही. पण यामुळे रोज 100 विद्यार्थ्यांना व इतर ग्रामस्थांना वाघाचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांनी बस अडवून आंदोलन केले पण त्यांना बस मिळत नाही. आता तो वाघ असेल किंवा बिबट्या त्याने लहान मुले किंवा माणसांवर आक्रमण करे पर्यंत अधिकारी वाट पाहणार आहेत काय असा प्रश्न आहे.