सोमवार 30 सप्टेंबर पासून शहरातील टिळकवाडी येथील तिसरा गेट रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले आहे यासाठी बेळगाव शहरातील रहदारी मार्गात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत पोलीस खात्याने प्रसिद्धी पत्रक देऊन या मार्गात बदल केल्याची माहिती दिली आहे.उड्डाण पुलाचे काम संपेपर्यंत जनतेनी रहदारीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
1. खानापूर रोड वरून खानापूर पिरनवाडी बेमको कडून येणारी अवजड वाहने तिसऱ्या गेट कडून आर पी डी कडे पी बी रोड कडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
2.खानापूर पिरनवाडी कडून शहराकडे येणारी अवजड वाहने काँग्रेस रोड वरून जातील
3.खानापूर पिरनवाडी कडून शहराकडे येणारी लहान वाहने बेमको कडून वळून चौथ्या रेल्वे गेट मार्गे अनगोळ हुन शहराकडे जातील
4.खानापूर पिरनवाडी कडून आर पी डी अनगोळ शहापूर जुने बेळगाव वडगांव सुळगा येळ्ळूर कडे जाणारी लहान आणि दुचाकी वाहने काँग्रेस रोड दुसरे रेल्वे फाटक कडून जातील
5.गुरुप्रसाद नगर ,चौगुलेवाडी,आर सी नगर कडून आर पी डी टिळकवाडी वडगांव धामणे शहापूर कडे जाणारी लहान दुचाकी वाहने दुसऱ्या रेल्वे गेट कडून जातील हा मार्ग वन वे असेल
6.अनगोळ ,शहापूर वडगांव हिंदवाडी, जुने बेळगाव, कडून आर पी डी हुन दुसऱ्या रेल्वे गेट कडे जाणारी सर्व प्रकारांच्या वाहनांना नो एन्ट्री असेल
7.अनगोळ शहापूर वडगांव जुने बेळगाव हिंदवाडी कडून आर सी नगर गुरू प्रसाद नगर मंडोळी रोड कडे जाणारी वाहन गोवा वेस सर्कल मिलेनियम गार्डन रस्त्या द्वारे आणि देशमुख रोड वरून जाणारी वाहने पहिल्या रेल्वे गेट कडून खानापूर रोड जाऊ शकतात.
8.बेळगाव शहर चनममा सर्कल कडून खानापूर कडे जाणारी अवजड वाहनाना काँग्रेस रोड वरून नो एंट्री असणार आहे.तर ही वाहन गोगटे सर्कल उड्डाण पूल आर पी तिसऱ्या रेल्वे फाटका वरून जातील(ही देखील वन वे असेल)
9.बेळगाव शहर चनममा सर्कल कडून खानापूर कडे जाणारी लहान वाहन आणि दुचाकी काँग्रेस रोड तसेच गोगटे सर्कल उड्डाण पूल आर पी तिसऱ्या रेल्वे फाटका वरून जातील.
10.अनगोळ नाक्या पासून तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंत दोन्ही बाजूनी वाहने थांबवण्यास बंदी करण्यात आली आहे.