पर्यावरणाची हानी करणाऱ्या लाटेच्या विरोधात जाऊन झाडे तोडणार्या, विकासाच्या नावाखाली झाडे नष्ट करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन बेळगावातील पर्यावरणवादी किरण निपाणीकर यांनी नागरिकांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले आहे .सरकारी अधिकारी आणि नागरिकांची हातमिळवणी करून त्यांना झाडांचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी 48 झाडांचे पुनर्रोपण केले आहे. यामुळे आज बेळगावात किरण निपाणीकर यांची ओळख बेळगावचा ट्री मॅन अशी निर्माण झाली आहे .
मागील सहा महिन्यात त्यांना 48 झाडांचे जीव वाचवण्यात शंभर टक्के यश आले. त्यांनी पूनररोपीत केलेली सर्व झाडे आता पुन्हा जीव धरत असून वाढत आहेत. या कामात सार्वजनिक बांधकाम खाते, कॅन्टोन्मेंट बोर्ड ,वनविभाग आणि काही दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे .
जागतिक तापमान वाढ एक गंभीर समस्या बनत असताना माणसं बदलत नाहीत. विकास आणि आरामदायी जीवनासाठी झाडे तोडण्यावर भर देतात .मात्र विकासाची कामे झाडे न तोडता करता येतात यासंदर्भात मागील वर्षापासून आपण जागृती केली. टिळकवाडी , नानावाडी आणि भाग्यनगर येथे झाडांचे पुनर्रोपण केले.
जांबोटी या खानापूर तालुक्यातील गावात ही त्यांनी ही कामे केली. यासाठी त्यांना दानशूर लोकांची मदत झाली. किरण निपाणीकर यांचे काम बघून काही लोकांनी पर्यावरणवाद्यांनी त्यांना भेटण्यास सुरुवात केली .तुमकुर येथील जिल्हा प्रशासनाने ही त्यांना नुकतेच बोलवून घेऊन 21 झाडे पुन्हा उभे करण्यासाठी करण्यासाठी त्यांची मदत घेतली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरातील तीस मोठी झाडे तोडण्यात येत होती .
झाडे तोडू नका त्यासाठी त्यांनी जागृती केली पण ती झाडे त्यांना वाचवता आली नाहीत . वनविभागाकडे झाडे तोडण्यासाठी अनेक अर्ज येतात असे अर्ज आले की त्याची माहिती किरण निपाणीकर यांना दिली जाते. मग ते झाड दुसरीकडे लावण्यासाठी किरण निपाणीकर दानशूर व्यक्तींचा शोध घेतात आणि झाडे लावली जातात .हे काम सुरू असून त्यांच्या कामामुळे अनेक झाडे वाचू शकली आहेत आणि पर्यावरणही वाचत आहे.