खानापूर तालुक्याच्या बेकवाड येथे घडलेली घटना परिवहन कर्मचाऱ्यांची मुजोरी दाखवणारी आहे. समोरून बस अडवण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते मात्र ती बस थांबवली जात नाही तर विद्यार्थ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न होतो आणि त्यात विद्यार्थ्यांचा जीवही जाऊ शकतो अशा घटनेत परिवहन कर्मचाऱ्यांना इतकी मुजोरी आली कुठून हा प्रश्न गंभीर बनत चालला असून आता ही मुजोरी थांबवण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे अन्यथा लोक भडकून जाऊन नको त्या अप्रिय घटना घडण्याची वेळ येणार आहे.
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातून बेळगाव शहराकडे शिक्षण आणि इतर कारणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच खानापूरच्या काही भागातून अळणावर दांडेली या कारवार जिल्ह्यातील भागाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही समस्या होत आहे दररोज बस भरलेल्या असतात त्यावेळेस स्टॉपवर थांबली जात नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या आडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
ईदल होंड येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी बस फोडण्याची घटना घडली त्याचप्रमाणे बेकवाड येथे बस रोखण्याचा प्रयत्न तील विद्यार्थ्यांना न जुमानता बस चालकाने बस पुढे नेण्याचा प्रकार घडला यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. केवळ एका चालकाला निलंबित करून चालणार नाही तर बस चालकांची मुजोरी कमी करायला हवी!
चालकाच्या मुजोरी विरुद्ध बेकवाड ग्रामस्थांचा संताप
बस चालका विरोधात बेकवाड ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून खानापूर बिडी मार्गावरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
त्या मुजोरी केलेल्या बसचालकाला अटक केली जात नाही तसेच या मार्गावर शाळेच्या वेळेत बस सुविधा केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता या आंदोलनात पालक महिला व बालकासह बेकवाड ग्रामस्थाने आंदोलन केलं त्यामुळे सकाळपासून दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .
बेकवाड येतील ग्रामस्थांचे आंदोलन केले त्याच बरोबर युवा समिती या बेळगावातील मराठी युवकांच्या संस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने आंदोलन केले आता या प्रकारची आंदोलने झाली मात्र प्रशासनाने परिवहन कर्मचारी वर्गाची मुजोरी रोखण्यासाठी परिवहन अधिकारी काय करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.