belgaum

स्टार एअरची बेळगाव मुंबई फ्लाईट सुरू

0
281
Star air
 belgaum

बहुप्रतिक्षित बेळगाव मुंबई विमानसेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला.संजय घोडावत यांच्या स्टार एअरलाईन्सने बेळगाव मुंबई विमानसेवा सुरू केली आहे.केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बेळगाव मुंबई विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

आठवड्यातील सहा दिवस बेळगाव मुंबई विमानसेवा असणार आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बेळगाव मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी बेळगावच्या जनतेने केली होती पण अनेक कारणांमुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब होत होता.

बेळगावहून मुंबईला अनेक उद्योजक आणि व्यावसायिक नेहमी जात येत असतात त्याना बेळगाव मुंबई विमानसेवेचा उपयोग होणार आहे. आता मुंबईला स्पाईस जेट आणि स्टार एअर अश्या दोन फ्लाईट उपलब्ध झाल्या आहेत. सदर सेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.