दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपून सहा महिने लोटले. मात्र त्याचे प्रमाणपत्र अजून मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत होती. शिक्षण खात्याच्या आंधळ्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत होता. पण सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक विध्यार्थीना अर्धवटच शाळा सोडावी लागली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सहा महिन्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्याने डिप्लोमा धारकांना प्रवेश देण्यात अडचणी झाले आहेत. याच बरोबर पुढील भविष्यासाठी हा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून बाहेरील राज्यात प्रवेश घेताना ही आता मोठी कसरत करावी लागली आहे. तब्बल सहा महिन्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्याने नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.
मार्च महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा झाली होती. मात्र याआधी एक ते दोन महिन्यात प्रमाणपत्र देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी सवलती देण्यात येत होत्या. आता शिक्षण खात्याच्या आंधळ्या कारभारामुळे अनेकांना शिक्षणाची पायवाट विसरावी लागली आहे. याचा परिणाम आणि त्यांचे भविष्य अंधारात गेल्याचे दिसून येत आहे. शिक्षण खात्याच्या आंधळ्या कारभाराबद्दल पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही दहावीचे विद्यार्थी बाहेर राज्यात प्रवेश घेत होते. मात्र प्रमाणपत्र नसल्याने अनेकांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले आहे. शिक्षण खात्याच्या भोंगळ कारभाराबद्दल पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचा विचार करून यापुढे तरी प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिक्षण खात्याने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. या कारभारामुळे मात्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालणाऱ्या शिक्षण खात्याला जाग तरी कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.