पंधरा दिवसात बॉयलर प्रदीपन करणार व लवकरात लवकर कारखाना सुरू करणार त्यासाठी शेअर जमा करा अशी सर्वसाधारण बैठकीत घोषणा झाल्यानंतर कधीही सुरू होऊ न शकलेल्या मार्कन्डेय साखर कारखान्याच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बेळगाव live ने खरपूस समाचार घेतला .
खरंच कारखाना सुरू होणार की पोकळ घोषणा आहे यासंदर्भात आरोप केल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर आरोप होताना दिसत आहेत .मार्कंडेय साखर कारखान्याच्या कारभार म्हणजे संगनमताने चाललेली लूटमार आहे असे एका व्यक्तीने म्हटले आहे .स्पेशल गोड साखर खायला आणखी वीस वर्षे लागतील असे एकाने म्हटले आहे. मार्कंडेयचा मुहूर्त लागेपर्यंत जगबुडी होते अशी प्रतिक्रिया सुद्धा आली आहे.
1000 चे शेअर्स न घेता तेंव्हाच जमीन घेतली असती तर आतापर्यंत त्या जागेची किंमत 90 लाख झाली असती असेही लोक म्हणतात . साखर फॅक्टरी दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. आम्ही गोड साखरेची वाट बघत बसणार .अशा प्रतिक्रिया आल्या आहेत.
मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक वर्गाबद्दल या पद्धतीचा असंतोष आहे. कायम कारखाना सुरू करतो असे सांगून आम्ही दरवर्षी शेअर गोळा करायचे कोणत्या ना कोणत्या मार्गातून पैसे जमा करायचे आणि साखर कारखाना सुरु करतो असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून याबद्दल नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांनी तर आंदोलनाची भाषा केली आहे आमच्या शेअर्सची रक्कम व्याजासकट परत द्या अशी मागणी शेतकरी करण्याच्या तयारीत आहेत.