अमेरिकेनंतर बेळगाव live च्या सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेला फ्रान्स मधील बेळगावकराने प्रतिसाद दिला आहे. चक्क फ्रान्स मधून त्यांनी पूजवलेल्या गणपती बाप्पासोबत आपल्या कुटुंबाची सेल्फी बेळगाव live कडे पाठवली आहे.
विठ्ठलराव गंगाराम पाटील असे त्यांचे नाव असून ते मोरोक्को मधील अल जदीदा सिटी मध्ये जेन फार्मसी कंपनीत कामाला आहेत. आपल्या कुटुंबासह ते तेथेच वास्तव्यास आहेत.ते मूळचे मु. ढेकोळीवाडी राकसकोपचे असून त्यांचे घर शेरी गल्ली बेळगाव येथेही आहे.
फ्रान्स मधील घरात त्यांनी मोदींनी-शहानी कलम 370 हटावचा एेतिहासिक निर्णय घेतला व काश्मीर भारतीय देशाचा अविभाज्य प्रदेश झाला. या काश्मीर खोऱ्यातील देखावा तयार केला आहे. बेळगाव live च्या सेल्फी विथ गणपती बाप्पा या स्पर्धेत फ्रान्स मधून सहभाग नोंदवला आहे.
बेळगाव live च्या माध्यमातून आम्हाला फ्रान्स मध्ये सगळ्या बातम्या दररोज लागलीच समजतात. बेळगाव शहरातील बातम्या घडामोडी समजतात. विशेष म्हणजे पुराचे कव्हरेज आम्हाला आवडले अशी प्रतिक्रिया विठ्ठलराव पाटील यांनी फ्रान्स मधून दिली आहे.बेळगाव live टीमचे देखील त्यांनी विशेष आभार मानले आहेत.