विमान उड्डाण-लँडिंग करतेवेळी उडत्या पक्ष्यांचा अडथळा येत आहे. पक्ष्यांचा विमानांना अडचणी होत असल्याचे कारण पुढे करत सांबरा भागातील मांसविक्री दुकानावर निर्बंध घालण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना केली आहे. एअर क्राफ्ट ऍक्ट 1934 (5)2 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी हा आदेश बजावला असून याचे उल्लंघन झाल्यास दहा लाख दंड किंवा दोन वर्षे कारावास तरतूद करण्यात आली आहे.
सध्या सांबरा विमान तळावरून दररोज 9 विमान बंगळुरू मुंबई अहमदाबाद पुणे हैद्राबाद या ठिकाणी झेप घेत आहेत
टाकाऊ मांसाहारी पदार्थामुळे विमानतळ परिसरात पक्षांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पक्ष्यांमुळे विमानांना अपघाताचा धोका संभवतो. यासाठी विमानतळाच्या 10 कि मी परिसरातील मांसविक्री दुकानावर निर्बंध घालण्याची मागणी विमानतळ प्राधिकरणच्यावतीने डी सि कडे करण्यात आली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यानी सांबरा भागातील मांसविक्री दुकानावर बंदी घालल्याची सूचना तहसीलदाराना केली होती.
डी सी च्या सूचनेनुसार तहसीलदारानी या भागातील सांबरा, मुतगा, निलजी, बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री, मोदगा, सुळेभावी, मारिहाळ, करडीगुद्दी ग्रामपंचायत पिडिओना नोटिस पाठवून कत्तलखाने, मटण आणि चिकन विक्री दुकान बंद करण्याची सूचना केली आहे. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची सूचना करण्यात आली आहे. मांसविक्री दुकानदारांची संपूर्ण माहिती, विमानतळापासूनचे अंतर आणि टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट आदी माहिती पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.आदेश न पाळणाऱ्या पिडिओ विरुध्दही कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहेनोटिस मिळताच विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अनेकांच्या पारंपरिक व्यवसाय वर संक्रांत आल्याने या समस्येवर उपाय काय? या वर चाचपणी सुरू आहे.