बेळगाव शहरातील स्वच्छतेचा प्रश्न व त्याचे वाजलेले तीन-तेरा याची चर्चा आणि ममहानगरपालिकेचागलथान कारभार कायम चर्चेत आहे. स्मार्ट सिटी म्हणून डंका गाजवणार्या महानगरपालिकेत स्वच्छतेच्या दृष्टीने तीन-तेरा झालेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देत नाहीत. उपचारासाठी पैसे देत नाही .त्यामुळे वारंवार आंदोलने सुरू आहेत .अशा परिस्थितीत पैसे नसलेल्या अनिल कांबळे या स्वच्छता कर्मचारी असलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्थेच्या कर्मचारी जर धोक्यात असेल तर सामान्य नागरिकांचे काय? हा मुद्दा यामुळे चर्चेला आला आहे. महापालिकेच्या स्वच्छता कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले आहे .
पैशाचा अभाव असल्यामुळे वेळेत उपचार घेतले नसल्यामुळे आजारी असलेल्या स्वच्छता कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यामुळे स्वच्छता कामगाराचा मृत्यू झाला . असा आरोप संघटना कर्मचाऱ्यांनी केला आहे. अस्वच्छ वातावरणात काम करत असल्यामुळे डेंग्यू झालेल्या कामगाराला महानगरपालिकेने वेळेत मदत देण्याची गरज होती पण दिली नाही.
आता सर्वसामान्य नागरिकांनाही ठीक ठिकाणी डेंग्यूचे आजार होत असून शहरातील खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. महानगरपालिकेच्या गलथान कारभाराने हे सगळे झाले आहे. केंद्रीय पातळीवर शहरांच्या स्वच्छतेचा आढावा घेतला असता महानगरपालिकेचा नंबर ४०० हुन पुढे गेला होता.
त्यानंतर काही दिवस सकाळच्या वेळी जाणारी वाहने आणि इतर कामे करण्याकडे लक्ष देण्यात आले .मात्र स्वच्छता कर्मचारी नाराज असल्यामुळे आणि त्यांचे वेतन मिळत नसल्यामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचा कारभार व बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी शशीधर नाडगौडा संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. स्वच्छता कंत्राटदारांचे संगनमत करून आरोग्य अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार चालवल्याचा आरोप महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आमचे पगार वेळेवर दिले जात नाहीत. मात्र आपले खिसे भरून घेतले जातात. असा आरोप नाव न सांगण्याच्या नावाखाली मनपाच्या आरोग्य अधिकारी यांच्यावर झाल्यामुळे आता महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त पदावर एका अधिकाऱ्याला योग्यरित्या काम करू दिले जात नाही त्यामुळे महानगरपालिका किती भ्रष्ट आहे आणि खालच्या अधिकाऱ्यांचे किती जोरात लागेबांधे चालू आहेत हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. स्वच्छता केली जात नाही. कर्मचारीच धोक्यात आहेत तर सर्वसामान्य नागरिकांचे काय होणार हा प्रश्न गंभीर आहे.