सतत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला समजावल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांचा निर्घृण खून केला. त्याने वडिलांचे शिर धडावेगळे केले, तर उजवा पाय कापून बाजूला ठेवला. हा सगळा घोळ पब्जी या वेड लावणाऱ्या खेळानेच केला आहे. आता त्या मुलाला कारागृहात हा खेळ खेळावा लागेल.
शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांचा मुलगा रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे. मृत वृद्ध तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा सशस्त्र दलातून निवृत्त झाले होते. पब्जी खेळू नकोस हे सांगणे त्या पित्याच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.
रघुवीर हा मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याला मोबाईलचे प्रचंड वेड असून तो सतत मोबाईल घेऊन बसायचा. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली. तो सतत पबजी गेम खेळत होता. हा खेळ खेळताना तो विकृत झाला होता. वडील ओरडतात याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले होते.
रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास मुलगा पुन्हा मोबाईल मध्ये मग्न झाला. हे पाहून वडिलांनी त्याला पुन्हा फैलावर घेतले. याचाच राग धरून मुलाने आज पहाटे आई महादेवी यांना घराबाहेर काढले. वडिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वडील त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वडिलांच्या गळ्याला धरत ढकलून खाली पाडले. सर्वप्रथम गळा दाबून त्यांचा खून केला.यानंतर, घरातील विळीने त् वडिलांचे शीर धडावेगळ केले. त्यांचा डावा पायदेखील कापून बाजूला ठेवला. बेळगाव ग्रामीणचे एसीपी शिवा रेड्डी, काकतीचे निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.ही विकृती वाढू नये म्हणून आता पालकांनी प्रयत्न करायला हवेत.
पब्जी हा मोबाईल मध्ये असणारा खेळ जीव घेणा ठरू लागला आहे त्यामुळं या गेम वर बंदी आणावी अशी मागणो जोर धरू लागली आहे.मोबाईल गरजे पुरता वापरणे ठीक आहे मात्र अति मोबाईल वापरा मुळे ,सोशल मीडियात गुंतल्याने असे प्रकार वाढू लागलेत का याच चिंतन देखील करण्याची वेळ आली.