पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मनाला लावून घेऊन कणबर्गी येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कणबर्गी येथील नितीश प्रभाकर कुडवेकर (३२) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
नितीश आणि पत्नी यांच्यात वाद झाला आणि हे प्रकरण महिला पोलीस स्थानकापर्यंत पोचले.पोलिसांनी नितीश याला मारहाण केली.पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मनाला ही घटना लावून घेऊन नितीशने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नितीश याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी पती पत्नीतील वादातून सदर प्रकार घडल्याचे सांगितले.