महानगरपालिकेच्या आरक्षण आणि वार्ड पुनररचना विरोधात वकील धनराज गवळी आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे.
गुरुवारी धारवाड येथे उच्च न्यालायच्या खंडपीठात सुनावणी होणार होती पण सरकारी वकिलांनी पुन्हा मुदत मागितल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
सुनावणी दरम्यान सरकारी वकील सीमा नायक यांनी पुन्हा मुदत मागितली त्यामुळे आता 26 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती याचिकाकर्ते वकील धनराज गवळी यांनी दिली.
एकीकडे मनपा निवडणुकीची तयारी करत असताना दुसरीकडे या याचिकेवर तारीख पे तारीख पडत आहे.