तालुक्यातील पूर्व भागात एका ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकार्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने काही नागरिकांनी दोरी कापून त्या पिडिओला वाचविण्यात यश आले आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित ग्राम विकास अधिकारी ही अनेक गैरप्रकार केल्याचा आरोपही आहे. मात्र आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तालुका पंचायत व ग्राम पंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतानाच काही सदस्यांनी दोरी कापून त्या संबंधित ग्राम विकास अधिकारी महिलेला वाचविले आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील शेवटच्या टप्प्यात असणार्या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत मध्ये आत्महत्या करून घेण्यामागे कोणते कारण असेल याबाबत चौकशी केली असता काही ग्रामपंचायत सदस्य मानसिक छळ करत असल्याने संबंधित अधिकारी महिलेने हा प्रकार केला आहे. या प्रकारामुळे साऱ्यांचे भंबेरी उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.
संबंधित ग्राम विकास अधिकारी महिले बाबत अनेक तक्रारी ही करण्यात आले आहेत. तालुका पंचायत मध्ये देखील याबाबत व जिल्हा पंचायत मध्ये देखील याबाबत तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र आत्महत्येसारखा पाऊल उचलणे हे कितपत योग्य आहे? हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी महिलेने काही सदस्य त्रास करत असल्याचे सांगून हा प्रकार केला आहे. मानसिक छळ झाल्याने ग्रामपंचायत मध्येच आत्महत्या करून घेऊन अनेक सदस्यांना अडचणीत घालण्याचा प्रकार होता. मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने त्या महिलेला वाचविण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नसली तरी चर्चा मात्र तालुक्यात जोरदार आहे.