सांबरा विमानतळावर रात्रीचे पार्किंग करण्याची सोय उपलब्ध असतानाही आजपर्यंत कुठल्याही विमानसेवा घेतली नव्हती . स्टार एअर कंपनीने आता ती घेतली असून यापुढे आपले विमान रात्रीच्या वेळी पार्किंग करण्यात येणार आहे .अशी माहिती कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीतर्फे सध्या अनेक विमानसेवा सुरू आहेत. त्यामुळे आपल्या स्वतंत्र ठिकाणी विमान पार्क करून विमान योग्य वेळी घेऊन येत होते .
आता रात्रीच्या वेळी एक विमान वस्तीला येणार आहे .हेच विमान सकाळी लवकर सेवा देणार असल्याची माहिती मिळाली. अहमदाबाद ला जाणारे विमान बेळगाव सकाळी सात वाजून 45 मिनिटांनी निघणार आहे. अहमदाबादला पोचून ते विमान नऊ वाजून 45 मिनिटांनी बेळगावला येणार असून त्यानंतर पुन्हा सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी मुंबईला जाणार आहे.
बेळगाव विमानतळावर अनेक सेवा सुविधा सुरू करण्यात आल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी पार्किंग ही सोय करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे विमानतळाला भाडे द्यावे लागते. मात्र रात्रीच्या वेळी पार्किंग केल्यामुळे सकाळी लवकर विमान सेवा देणे विमान कंपन्यांना सोयीचे ठरते. यासाठी रात्रीच्या पार्किंगचा विचार कंपनीने केला आहे अशी माहिती विमानतळ संचालकांनी दिली आहे.अहमदाबाद लवकर सुरू झाल्यामुळे बेळगाव हुन राजस्थान आणि उत्तर भारतात जाणाऱ्याना सोयीचे होणार आहे त्यांना अहमदाबाद हुन कनेकटिंग फ्लाईट्स मिळणार आहेत.