Friday, December 20, 2024

/

एकनाथ पाटील नेशनबिल्डर अवॉर्डने सन्मानित..

 belgaum

बेळगाव येथील ई रोटरी क्लब ऑफ बेळगाव या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्थेने बेळगांवातील शिक्षण क्षेत्रात कामगिरी केलेल्या शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित करण्याचे कार्य गेली ४ वर्षे चालू ठेवलेले आहे. शिक्षकाचे कार्य राष्ट्र बांधणीत सिंहाचा वाटा ठरते. समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकचं करत असतो म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी हा सन्मान दिला जातो.

बालिका आदर्श विद्यालयात गेली २७ वर्षे सेवेत असणारे मराठी विषयाचे अध्यापक एकनाथ पाटील यांना ई रोटरीने नेशन बिल्डर अवॉर्डने सन्मानित केले. सदर कार्यक्रम सँटोरीनी हॉटेल (तिसऱ्या रेल्वे फाटका जवळ) येथे नुकताच संपन्न झाला. पुरस्कार निवडीची पद्धत योग्य असल्यानेच हा पुरस्कार स्विकारला गेला.

शाळा सुधारणेच्या कiर्यात मोलाचा वाटा, शाळा आणि विद्यार्थ्यांचा विकास हेच ध्येय माननारे, माझी शाळा माझा अभिमान या अभियांना अंतर्गत अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास करवून घेणे, मुलांच्या कलागुणांना वाव देणे, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर,बालकरांना लक्षवेधीच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, शिक्षकसंघा मार्फत निःस्वार्थपणे शिक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणी सोडविणे, बेळगांव जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकाल वाढीसाठी विविध शिखरांचे आयोजन, चंदगड बहुउद्देशीय संस्थेमार्फत आर्थिक मागसलेल्या कुटुंबाना मदत करणे, शैक्षणिक मदत मिळवून देणे अशा विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल ई रोटरीने घेतल्याने एकनाथ पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.

या आधि जाईंट्स ग्रुप ऑफ बेळगांवचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि योगेश्वरी प्रतिष्ठान इचलकरंचीचा बालरंगभूमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.