Tuesday, December 24, 2024

/

राज्य मंत्र्यांनी केलं पिडीत कुटुंबाचे सांत्वन

 belgaum

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी गणेश उत्सव मिरवणुकीत डॉल्बी वरून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले.कामत गल्ली येथील राहुल सदावर वय 38 याचे विसर्जन मिरवणुकीत अपघाती निधन झाले होते.
राहुल हा रोजंदारी वर फर्निचर काम करत होता त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे त्याच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत त्यामुळे अचानक सदावर कुटुंबियांवर बसलेल्या आघातावर त्यांना सावरण्याची गरज बनली आहे.

Mos railway

मध्यवर्ती गणेश महा मंडळाने देखील या पीडित कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले असून आर्थिक मदत गोळा केली जात आहे.रविवारी सकाळी अंगडी यांनी या कुटुंबियांना भेट देत सांत्वन केले व जिल्हाधिकाऱ्याना याबाबत शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी मयत युवक राहुल सदावर लहान मुलींचा शिक्षणाचा खर्च व कुटुंबाचा आधारवड हरपल्याने त्याला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली त्यावर अंगडी यांनी आपण याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू असे आश्वासन दिले.यावेळी राहुल मुचंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.