वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी अंडर पास ब्रिज ऐवजी बेळगावात सगळीकडे ओव्हर ब्रिज करा अश्या सूचना रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.शनिवारी काडा ऑफिस मध्ये रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकारी,जिल्हा प्रशासनाचे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.
सध्या शहरात सुरू असलेल्या Lc381 या तिसऱ्या रेल्वेगेट उड्डाण पुलाच्या कामा बाबत व रेल्वे स्थानकाच्या होणार असलेल्या विकास कामाबद्दल व रेल्वेच्या बांधकामा बद्दल बैठकीत चर्चा झाली.
शहरात रहदारीला कोणतीही अडचण होऊ नये यासाठी अंडर ग्राउंड ब्रिजीस नकोत सगळी कडे ओव्हर ब्रिजेच करा जर का अंडर ग्राउंड ब्रिज बनवली तरी पावसात चिखल होऊन पाणी भरत आहे त्यामुळे ओव्हर ब्रिजचे प्रस्ताव तयार करा अश्या सूचना दिल्या.
प्रवाश्यांना आणि जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून कामे करा काम करताना कुणाचा दबाव घेऊ नका अश्या सूचना त्यांनी दिल्या.जिल्हा प्रशासनाचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाण पुलाचे काम गोगटे सर्कल उड्डाण पुला प्रमाणे होऊ नये यासाठी रेल्वे मंत्र्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा जनतेत व्यक्त होताना दिसत आहे.