गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळेस येत आहेत. दोन धर्मियांच्या सणांच्या पार्श्वभूमीवर आगळ्या प्रकारचे एकात्मता दाखविण्याचे काम नवी गल्ली परिसरात पाहायला मिळाले.
यावर्षीही आज मंगळवारी नवी गल्ली येथील मशिदी पासून मोहरम पंजे मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीचे स्वागत केले. शहापूर विभाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रवी साळुंके व अन्य मान्यवरांनी यावेळी पंजांचे स्वागत केले.
शहापूर पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यावेळी जातीने उपस्थित होते.अमजद मोमिन,अब्दुल हमीद बागलकोटी, पापुल सनदी इमाम हुसेन टेलर, यांच्यासह दोन्ही धर्मातील लोक मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.