वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून तरुण मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता सिद्धेश्वर नगर ,काकती येथे घडली आहे.
रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले.नंतर त्यांनी मुलाचा मोबाईल काढून घेतला.मोबाईल काढून घेतत्यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील विळी घेऊन वडिलांची चिरून निर्घृण पणे हत्या केली आहे.
रघुवीर कुंभार असे वडिलांची हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.तीन वेळा तो डिप्लोमा परीक्षेत नापास झाला असून कामधंदा न करता तो घरातच बसून होता. वडिलांचे नाव शंकर देवाप्पा कुंभार असे असून ते जिल्हा सशस्त्र दलात पोलीस होते. विळी सारख्या धारधार शस्त्राने वडिलांचे तीन तुकडे केले धड शीर वेगळे करत लेकाने बापाचा खून केला आहे आईला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्याने जन्मदात्या बापाचा असा निर्घृण खून केला आहे त्यामुळे या भागात खळबळ माजली आहे.
तीन महिन्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते.काकती पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मानसिक विकृतीने केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.अति मोबाईलचा वापर माणसाला मानसिक विकृत बनवतो का?यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.