Sunday, December 22, 2024

/

खळ खट्टयाकचा इशारा देत युवा समितीने केल्या या मागण्या

 belgaum

खळ खट्टयाकचा इशारा देत युवा समितीने केल्या या

बेकवाड येथील विद्यार्थ्याच्या अंगावर बस चालवणाऱ्या बस चालकाला निलंबित केले असले तरी इतर चालकांनी मुजोरी बंद करावी जिथं हात दाखवतील तिथं बस थांबल्या पाहिजेत अन्यथा युवा समिती खळ खट्टयाक आंदोलन हाती असा निर्वाणीचा इशारा देत परिवाहन खात्याला निवेदन दिले.

याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून परिवहन विभागीय नियंत्रणाधिकारी एम.आर. मुंजी याना निवेदन देण्यात आले आणि बस संबंधी समस्या लवकर सोडवा नाहीतर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी बेकवाड,खानापूर येथे विद्यार्थ्यांच्या अंगावर बस चालविणाऱ्या हल्ल्याळ बसचा ड्रायव्हर ए.एस.एफ. शेख याला निलंबित करण्यात आले याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.त्याच बरोबर खालील मागण्यास निवेदन देण्यात आले.

शहर आणि आजूबाजूच्या उपनगर आणि गावातील विद्यार्थी, महिला आणि जेष्ठ नागरिकांची बस ही मूलभूत गरज आहे. पण बस सेवा म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नेमकी ही सेवा लोकांच्या सोयीसाठी आहे की गैरसोयीसाठी ?
म्हणून सर्व प्रवाश्यांच्या हक्कासाठी युवा समिती आवाज उठवित आहे, बस प्रवाश्यांना आणि विद्यार्थ्यांना खालील पैकी समस्यांना सामोरे जावे लागत

१) बस या वेळापत्रक प्रमाणे येत नाहीत आणि जर आल्या तर त्या एकाच वेळी 2 किंवा 3 येतात आणि नंतर बराच वेळ प्रवाशांचा खोळंबा करतात, आम्ही अशी मागणी करीत आहोत की प्रत्येक बस थांब्यावर वेळापत्रक ठळक अक्षरात लिहिण्यात यावे.

२) बस व्यवस्थित बस थांब्यावर न थांबविणे, अंतर ठेवून पुढे किंवा मागे थांबविणे.

३) बस थांबविताना रस्त्याच्या मधोमध थांबविणे आणि गाडी सुरू असतानाच प्रवाश्यांना चढविणे किंवा उतरविणे पण हे अपघातास कारण होऊन प्रवाश्यांच्या जीवावर बेतू शकते.

४) शहर परिसरात येण्यासाठी किंवा जातेवेळी विद्यार्थ्यांचे आणि जेष्ठ नागरिकांचे बस पास स्वीकारले जात नाहीत, आम्ही अशी मागणी करीत आहोत की शहर भागातून जाणाऱ्या 50 की.मी. सभोवतीच्या सर्व बस मध्ये हे पास स्वीकारले जावेत. कारण काही अडचणीच्या वेळी ज्यावेळी विध्यार्थी किंवा इतर पासधारक प्रवासी यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांना अडचण येऊ शकते किंवा शैक्षणिक नुकसान सुद्धा होऊ शकते.

५) बसचे वाहक किंवा चालक प्रवाश्यांशी उद्धट वागतात, पासधारकांशी तर उपकाराची भाषा असते किंवा चिल्लर देते घेते वेळी हुज्जत घालण्याचे प्रकार होत असतात,
6) बसचे फलक मराठी भाषेत सुद्धा लावण्यात यावेत
7) बेकवाड, ता. खानापूर येथे दि. 24/9 रोजी मुजोर बसचालकाने बस न थांबवता भरधाव बस विद्यार्थ्यांच्या अंगावर चालविण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा निषेध करतो आणि संबंधित हल्ल्याळ बस चालक आणि वाहकावर कार्यवाही करावी अशी मागणी करतो.
वरील समस्या त्वरित सोडवून आपण परिवहन सेवेमध्ये सुधारणा कराव्यात जर हे निवेदन देऊन सुद्धा याची दखल घेतली गेली नाही तर आम्ही उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत.

यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, किशोर मराठे, विजय जाधव, किरण हुद्दार, विनायक कावळे, राम निळकंठ जाधव, संतोष दरेकर, संतोष कृष्णाचे, सचिन केळवेकर, रोहन लंगरकांडे, नागेश बोबाटे, जोतिबा पाटील, ओंकार चौगुले, विशाल गौडाडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.