*महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्या* अशी मागणी करत युवा समितीने महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना पत्रे पाठवली आहेत.भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाली पण महाराष्ट्रावर सुरवातीपासूनच अन्याय झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिथून सुरू झाली ते म्हणजे “बेळगाव”. पण 1956 पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह 865 गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनि तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे.म्हणून 2004 साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.आता वेळ आहे आली आहे शेवटचा भीमटोला देण्याची अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
ग
सुप्रीम कोर्टातील खटला वेगाने चालावा व 1956 पासून प्रलंबित सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी आपल्या पक्षाने आणि आपण स्वतः सुद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करावेत आणि यासाठी सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमांकर घ्यावा आणि आपण यासाठी सिमावासीयांची बाजू मांडत पाठपुरावा करावा ही समस्त सीमाभागातील मराठी जनतेची कळकळीची मागणी आहे. वरील मागणी आपण आपल्या जाहीरनाम्यात सामील करून सीमाभागातील जनतेला आपण न्याय द्याल ही अपेक्षा आहे. असेही पत्रात नमूद केलं आहे.
सदर पत्रे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,मनसे प्रमुख राज ठाकरे,शेकापचे जेष्ठ नेते भाई एन. डी. पाटील,शेकाप चे नेते भाई जयंत पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,शिवसेनेचे संजय राऊत, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने,आमदार बच्चू कडू, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नारायण राणे, आर पी आयचे रामदास आठवले, वंचित चे प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,स्वाभिमानि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, भाई जगताप, संध्याताई कुपेकर, सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे, अशोक चव्हाण,आदी नेत्यांना पाठविण्यात आली आहेत.