महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी सीमा प्रश्न आपल्या जाहीरनाम्यात अग्र क्रमांकावर घ्यावा यासाठी युवा समिती मोहीम हाती घेणार आहे.
रविवारी सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक महागणपती देवस्थान लक्ष्मीरोड नाथ पै चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके होते. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्न अग्रक्रमांकर घ्यावा येत्या काळात सर्व पक्षांनी मिळून लवकर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी युवा समिती महाराष्ट्रातील सर्व पक्षांना पत्र पाठविणार आहेत.
मराठी शाळेत कन्नड शाळा घुसविण्याचा प्रयत्न चालविला आहे त्याचा निषेध देखील या बैठकीत मांडण्यात आला कन्नड शाळेला त्यांची स्वतंत्र इमारत बांधून देऊन मराठी शाळांवरील अन्याय दूर करण्यात यावा यासाठी आणि शिक्षक बदली प्रक्रियेत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक दिल्या शिवाय त्यांची बदली करू नये यासाठी जिल्हाशिक्षण अधिकारी आणि जिल्हा पंचायत शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल याना सोमवार दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता निवेदन देण्याचे देखील ठरवण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी सह्यांची मोहीम राबविणार असा देखील निर्णय घेण्यात आलाय.
बैठकीच्या सुरवातीला समितीचे निधन पावलेले प्रभाकर धोत्रे, मारुती कुगजी आणि गणेशोत्सव विसर्जनात अपघाती निधन पावलेले राहुल सदावर याना मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार नितिन आनंदाचे, चिटणीस किशोर मराठे, पदाधिकारी किरण हुद्दार, साईनाथ शिरोडकर, विजय जाधव, अश्वजित चौधरी, भावेश बिरजे, सुधीर शिरोळे, अजय सुतार, संदीप मिराशी, प्रवीण रेडेकर, अभिजित मजुकर, राकेश सावंत, विनायक मोरे, आदी उपस्थित होते.