अनेक मराठी शाळांमधील शिक्षकांची सक्तीने बदली करण्यात आली आहे नानावडी मराठी प्राथमिक शाळेचा सह इतर शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे अशा शाळांमध्ये लवकरात लवकर शिक्षक नेमावे आणि त्या शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नेमल्याशिवाय त्यांची इतरत्र बदली करू नये अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायत शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. मराठी शाळांच्या इमारतीत कन्नड शाळा सुरू करण्यात येत आहेत त्या रोखाव्या अशीही मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.
युवा समितीच्या वतीने रमेश गोरल यांना निवेदन देण्यात आले त्यावर गोरल यानी आपण संबंधित अधिकार्यांशी चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील,आर आय पाटील युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह सचिव श्रीकांत कदम, किरण हुद्दार, विनायक मोरे, विजय जाधवअन्य पदाधिकारी उपस्थित होते