स्मार्ट सिटी च्या धर्तीवर कला मंदिर टिळकवाडी चा विकास होणार आहे ,या पार्श्वभूमीवर या परिसरातील झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे . ही झाडे वाचविण्यात आली असती पण महानगरपालिकेने याकडे लक्ष दिले नाही. झाडे न वाचविणे मागे महानगरपालिकेचा कोणता स्वार्थ दडला होता? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
झाडे कापण्यासाठी एक टेंडर काढण्यात आले होते .ते टेंडर ऑनलाईन नव्हते. दिलेल्या व्यक्तीकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ता मिळाला का असा प्रश्न आहे. झाडे वाचली असती तर पर्यावरणाचे रक्षण झाले असते पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बेळगाव येथील शुन्य फाउंडेशन ने ही झाडे आपल्याला द्यावीत. व्यवस्थितपणे काढून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करतो असा अर्ज दिला होता. तुमकुर सारख्या शहरांमध्ये 21 झाडे पुनर्रोपण करण्याचा अनुभव असलेल्या संस्थेला खरे हे काम देणे गरजेचे होते. पण बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड आणि महानगरपालिकेच्या लोकांनी कंत्राट देऊन झाडे पाडून घेतले आहेत .
या प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे .कुठेही झाड तोडण्याची परवानगी आल्यास वनखात्याने परवानगी न देता पुनरुज्जीवित करण्याची अट घालावी. अशी मागणी होते. प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांनी योग्य रीतीने वागण्यास सुरू केल्यास नागरिक सुद्धा त्या पद्धतीने वागु शकतील यासाठी एकही झाड वाया जाऊ नये .तोडले जाऊ नये याची काळजी घ्यायची असल्यास आता सरकारी यंत्रणांनी शहाणे होण्याची गरज आहे.