बेळगाव विमान तळ उडान तीन योजनेत सामील केल्या नंतर बेळगाव हुन जोडलेले नवीन हवाई रूट केवळ समाधानकारक नसून विमान कंपन्यांना फायदेशीर ठरत आहेत.नवीन रूट ये जा करण्यात 80 टक्के पॅसेंजर मिळत आहेत .
उद्यमबाग मध्ये फौंद्री क्लस्टरच्या बक्षीस वितरण समारंभात सहभागी झाल्यावर ते बोलत होते.दररोज बेळगाव विमान तळावरून 20 विमान वेगवेगळ्या ठिकाणा साठी झेप घेत असतात हे वर्ष संपे पर्यंत हा आकडा वाढू शकतो तो 40 पर्यंत पोहोचेल असा आशावाद त्यांनी मांडला.
बेळगाव विमान तळावरून ट्रू जेट एअर कम्पनीची विमान सेवा देखील सुरु होणार आहे. उडान 2 योजने पर्यंत बेळगावातील विमान प्रवाशी हुबळी कोल्हापूर आणि गोव्यात जाऊन विमान सेवेचा लाभ घेत होते मात्र उडान तीन योजनेत बेळगाव चा समावेश झाल्या नंतर लोकांनी या विमान तळाचा वापर केला आहे. एका महिन्यात अंदाजे 21 हजार प्रवाशी बेळगावहुन वेगवेगळ्या ठिकाणी विमान प्रवास करत आहेत हा आकडा हैद्राबाद दिल्ली आणि तिरुपती विमान सेवा सुरु होताच वाढणार आहे असेही ते म्हणाले.