रविवारी भाग्यनगर येथील विद्युत तारांना मूर्ती स्पर्श होऊन आग लागल्या नंतर तारा उंच उंच गणेश मूर्ती हेस्कॉम जिल्हा प्रशासन हे मुद्दे पून्हा एकदा चर्चेत आले आहेत.गेल्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या सदाशिव नगर येथील घटनेची या निमित्ताने आठवण झाली आहे.
बेळगावच्या हेस्कॉम विभागाने गणेश मंडळाना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत त्या काय आहेत पाहुयात
श्री मूर्ती मूर्तिकाराकडून घेऊन जात असताना हेस्कॉमला कळवा अशी सूचना केलेली आहे.अनगोळ येथे काल मूर्ती नेत असताना मंडळाने हेस्कॉमला कळवले होते.त्यावेळी कर्मचारी हजर राहून विजेच्या तारा मूर्तीला लागणार नाहीत याची काळजी घेतली.
हेस्कॉमच्या विद्युत तारा जमिनीपासून आठ मीटर उंचीवर असतात पण अनेक मूर्ती खूप उंच असल्या तर त्याचा स्पर्श ताराना होण्याची शक्यता असते.जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेने मूर्तींची उंची कमी ठेवावी अशी मंडळांना सूचना केले पण त्याचे पालन केले जात नाही.त्यामुळेच विद्युतभारीत तारांचा स्पर्श होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असते.
हॅस्कोम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मूर्तीकारांना भेटून त्या भागातील लाईनमनचे फोन नंबर दिले असून मंडळे मूर्ती नेताना कळवा असेही सांगितले आहे.लाईनमन मूर्ती नेताना येऊन योग्य ती मदत करतील असे आवाहन हॅस्कोमने केले आहे.