पर्यावरण समतोल राखण्यासाठी जायंट्स चे अतुलनीय कार्य सुरू आहे असे गौरवोद्गार फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रवींद्र हकाटी यांनी काढले.दरवर्षी वृक्षारोपण करत असताना रोपे मिळण्याची अडचण लक्षात घेऊन जायंट्स चे उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर यांच्या संकल्पनेतून जायंट्स रोपवाटिका चालू करण्यात आली असून रोपवाटिकेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील,पिडब्ल्यूडी कंत्राटदार प्रकाश अष्टेकर उपस्थित होते.
व्यासपीठावर जायंट्स इंटरनॅशनल स्पेशल कमिटी सदस्य मोहन कारेकर, जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल भोसले आणि जायंट्स सखीच्या अध्यक्षा नम्रता महागावकर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
स्वागत आणि प्रास्ताविक मदन बामणे यांनी केले.
पुढे बोलताना हकाटी म्हणाले की वेगवेगळ्या फळांची बियाणे, किटनाशक तसेच खत मोफत देऊन रोपवाटिकेसाठी संपूर्ण सहकार्य करु असे सांगितले.सौ सरस्वती पाटील यांनी जायंट्स मेन प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असताना रोपवाटिका सुरू करून त्यांनी पर्यावरणासाठी सुध्दा आपण कार्य करतो हे दाखवून दिले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोहन कारेकर, सुनिल भोसले आणि नम्रता महागावकर यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालून रोपवाटिकेचे उदघाटन केले.
यानंतर सुनिल मुतगेकर यांचा रोपवाटिका सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी जायंट्स मेनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि जायंट्स सखीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.आभार उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर यांनी मांडले