शहराच्या भूइकोट किल्ल्या समोरील तलावाचा विकास स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केला जाणार आहे.यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा मागविल्या आहेत. तब्बल सव्वा सात कोटी खर्च करून या तलावाचा विकास केला जाणार आहे.
किल्ल्यासमोरील या तळ्याचा विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे .पहिल्या टप्प्याची विकासाची योजना साडे चार कोटी रु.ची आहे.त्यामध्ये गेट,स्टोअर रूम, किऑस्क,जेट्टी,बसण्यासाठी बाक आणि अन्य कामे पहिल्या टप्प्यात केली जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्याची योजना दोन कोटी सत्तर लाख रू ची आहे.त्यामध्ये धबधबा,सुशोभीकरण,स्वच्छतागृहे,विद्युतीकरण आदींचा अंतर्भाव आहे.वर्क ऑर्डर निघाल्यावर नऊ महिन्यात कंत्राटदाराने काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.