सरकारला पुरग्रस्तांना मदत देण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची कार अडवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून शेट्टर जात असताना त्यांनी मंत्र्यांच्या कार समोर ठिय्या आंदोलन केले.
पालकमंत्री जगदीश शेट्टर आज बेळगावला आले असता आंदोलन करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तसे करू दिले नाही. आपली व्यथा पालकमंत्र्यांवर मांडण्यासाठी शेतकरी एकवटले होते. त्यानी पालकमंत्र्यांकडे विनंती केली आमची मागणी मान्य करून घ्या पण पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता.
डी सी ऑफिस समोर पोलीस शेतकऱ्यांत हाय ड्रामा झाला यावेळो शेतकरी आणि पोलिसात झटापटी झाली.पुरग्रस्तांच्या समस्या सोडवा नुकसानभरपाई ध्या यासाठी शेतकरी आक्रमक झालेत.पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार यांच्या समोर हे आंदोलन झाले त्यावेळी पोलिसांचा पारा मात्र चढला होता.
बेळगावच्या पालकमंत्रिपद नव्याने नियुक्त झालेले जगदीश शेट्टर यांनी आज बेळगाव मध्ये दाखल होऊन प्रशासकीय आढावा घेतला या बैठकीत समाधानकारक तोडगा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवली . त्यावेळी शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले .जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतला .
पूर परिस्थिती मुळे झालेले नुकसान, भरपाईसाठी केले जात असलेले काम याचा आढावा घेतला आहे. त्यांचे पालक मंत्री नियुक्ती झाल्यापासून बेळगाव जिल्ह्यातील नेते मंडळींमध्ये नाराजी आहे .सरकारने त्यांना पालकमंत्रीपद नेमले जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचा विसर पडला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला होता .मात्र या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.