शिवछत्रपतींच्या नावाचा अखंड गजर करीत श्री दुर्गामाता दौडीला आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी दौडीला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला विशेष म्हणजे महिलावर्गाची उपस्थिती लक्षणिय होती. पुढील आठ दिवस दौडी मध्ये शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार पहिल्याच दिवशी दिसून आला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे अयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने शहर आणि परिसरात चेतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे.दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या दौडी मध्ये सहभागी शिवप्रेमींन वर पुष्पवृष्टी करून नागरिकांनी आपल्या सदिच्छा प्रकट केल्या.
(फोटो सौजन्य-prince clik)
नव्या पिढीला देव, देश आणि धर्म रक्षणाचे धडे देणाऱ्या दुर्गामाता दौडला सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी दौडला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून जय भवानी जय शिवाजीचा गजर करीत युवक, युवती व बालचमू दौडमध्ये सहभागी झाले होते. दौडच्या स्वागतासाठी रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्या सर्वांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरल्या होत्या. शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड परिसरात दौडच्या स्वागतासाठी भव्य रांगोळ्या आणि त्यात फुलांची आरास करण्यात आली होती.
छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून श्री वासुदेव छत्रे गुरुजी यांच्या हस्ते ध्वज चढवून दौडीस प्रारंभ करण्यात आला. संतसेने मार्गावरून दौड मार्गस्थ होऊन संपूर्ण शास्त्री नगर, गुड्स शेड रोड, कपिलेश्वर कॉलनी , महाद्वार रोड येथे मार्गक्रमण करीत दौड कपिलेश्वर मंदिर येथे पोहोचली. ACP आणि CPI धीरज शिंदे यांच्या हस्ते ध्वज उतरून दौडीची सांगता करण्यात आली
उद्याची(सोमवार) श्री दुर्गामाता दौड :
श्री गणेश मंदिर (राणी चनमा चौक) ते श्री दुर्गा माता मंदिर (किल्ला)