बेळगावचे सुपुत्र आणि कारवार जिल्ह्यात सेवा बजावत असलेले डी एस पी शंकर मारिहाळ हे सुखरूप आहेत रविवारी सायंकाळी पासून ते बेपत्ता होते.
कारवार जवळील कद्रा आणि गारे परिसरात महत्वाच्या तपासासाठी गेले असता रविवारी सायंकाळी पासून बेपत्ता झाले होते त्यानंतर त्यांचा शोध सुरू होता त्यांच्या सोबत आणखी एक पोलीस होता.
रस्ता चुकल्याने जंगल भागात अडकले होते असल्याची प्राथमिक माहिती मिळत मिळाली असून सध्या ते सुखरूप आहेत. त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचं बोलणं झालं आहे कारवार जंगलातील टेकडीवर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
नुकताच मारिहाळ यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बेळगाव शहरात अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती ते सुख रूप असल्याने बेळगावकरानी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.