बस अडवताना बस अंगावर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे. काल खानापूर बेकवाड येथे बस अडवताना सदर बस चालकाने कॉलेज विद्यार्थ्याला फरफटत नेले होते त्या नंतर हा फरफटत नेण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. सदर बस चालकाला निलंबित करा अशी मागणी वाढली होती.
अखेर प्रशासनाने के एस आर टी सी दांडेली विभागाच्या ए एम शेख नावाच्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे.धारवाड विभाग के एस आर टी सी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढला आहे. बस चालवताना काळजी न घेणें असे रहदारी नियमावली प्रमाणे आरोप सिद्ध झाला आहे.गेला आठवडा भर बेकवाड मधील विध्यार्थी रस्ता अडवत बस चा आधार घेत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला संभाव्य धोका लक्षात घेता बस आगाराच्या विरोधात बेकवाड ग्रामस्थांनी बुधवारी सकाळपासून खानापूर बिडी मार्गावरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ केला होत
जोपर्यंत त्या मुजोरी केलेल्या बसचालकाला अटक केली जात नाही तसेच या मार्गावर शाळेच्या वेळेत बस सुविधा केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता
या आंदोलनात पालक महिला व बालकासह बेकवाड ग्रामस्थाने आंदोलनात सहभाग घेतला होता या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.अखेर त्या बस चालकाला निलंबित करण्यात आले आहे.