बेळगावच्या सगळ्यात जुन्या आणि दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत गाजणाऱ्या चव्हाट गल्लीने यावर्षी मिरवणुकीत सर्वात लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आणि सहभागी होत असताना डॉल्बीमुक्त मिरवणूक करण्याचाही निर्णय घेतला आहे.
याकामी गल्लीतील पंच आणि एसीपी एन व्ही बरमनी यांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. याचबरोबरीने चव्हाट गल्ली आणि खडक गल्ली या दोन मंडळांमधील वादांमध्ये समझोता करण्याचे काम ही झाले आहे. यावर्षी मूर्तीची उंची कमी करून चव्हाट गल्लीने आदर्श निर्माण केला. बेळगाव live ने यासंदर्भात घेतलेल्या स्पर्धेत गल्लीचा विशेष सन्मानही केला.
(फोटो: श्री मूर्तीची कमी उंची केल्याने चव्हाट गल्ली गणेश मंडळाला विधायक गणेश मंडळ बेळगाव live ने सन्मानित केलेला क्षण)
आता डॉल्बीमुक्त मिरवणूक काढण्याचा निर्णय घेऊन एक मोठे काम केले आहे. यामुळे बेळगाव शहरात गल्लीचा आदर्श असेल. आता इतर मंडळांनी पाळण्याची गरज आहे . डॉल्बी बंदी आणि या अगोदर मूर्तीची कमी उंची हे दोन्ही निर्णय चव्हाट गल्ली येथील पंच महादेवराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही निर्णय घेण्यात आले आहेत.
काही दिवसांपासून खडक गल्ली आणि चव्हाट गल्ली मधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आणि संघर्ष निर्माण झाला होता .मात्र त्यामध्ये समझोता झाला आहे. झालेल्या एका बैठकीत हा तोडगा काढण्यात आला असून समजूत करणार्या प्रत्येकाचे बेळगाव live आभार मानत आहे