बेळगाव सह कर्नाटकातील पालक मंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून राज्यातील सर्वात मोठा असणारा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद बेळगाव बाहेरील मंत्र्यांना देण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात दोन मंत्रीपद आहेत त्यांना बाहेरील जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना कोप्पळ आणि बळळारी तर महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोलले यांना कारवार जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्याची सूत्रे हुबळी धारवाड येथील मंत्री असलेले जगदीश शेटटर यांना बेळगाव धारवाड पालकमंत्री पद देण्यात आले आहे. जगदीश शेटटर हे रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे व्याही आहेत त्यामुळे बेळगावचे पद त्यांना दिल्याने अंगडी यांचा जिल्ह्यावरील प्रभाव वाढणार आहे.
असे आहेत खालील पालक मंत्री
बी एस येडीयुरप्पा – बंगळुरू नगर
गोविंद कारजोळ -बागलकोट विजापूर
अश्वथ नारायण -रामनगर चिक्कबळापूर
के एस ईश्वरप्पा-शिवमोगा दावनगेरे
आर अशोक-बंगळुरू ग्रामीण मांड्या
बी श्रीरामलू-रायचूर चित्रदुर्ग
एस सुरेशकुमार- चमराजनगर
व्ही सोमनाना- मैसूरू कोडगू
सी टी रवी-चिकमंगळूरू
बसवराज बोममई- उडुपी हावेरी
कोटा श्रीनिवास पुजारी-मंगळुरू –
जी सी मधूस्वामी- तुमकुर हासन
सी सी पाटील-गदग विजापूर
एच नागेश -कोलार
प्रभू चव्हाण- बिदर यादगिरी