उत्तर कर्नाटकाच्या विकासाचे स्वप्न ठेवून कर्नाटक सरकारने बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधची इमारत बांधली या ठिकाणी दरवर्षी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. पण यावेळी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
या निर्णयाविरोधात काँग्रेसने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे .
उत्तर कर्नाटक पूर परिस्थितीत नष्ट झाले आहे. उत्तर कर्नाटका वर जास्त अन्याय झाला आहे नैसर्गिक आपत्ती ओढवून उत्तर कर्नाटकाचे नुकसान झाले आहे.
बेळगाव मध्ये अधिवेशन घेऊन उत्तर कर्नाटका साठी विकासाचे चांगले पॅकेज देण्याची गरज आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करताहेत. केंद्राकडून निधी आणून उत्तर कर्नाटकाचा विकास करणे त्यांना जमले नाही. अशा सरकारचा आणि सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो असे काँग्रेसने जाहीर केले आहे.
दिनेश गुंडू राव, जी परमेश्वर सिद्धरामय्या आदी नेते भाजप विरोधी आंदोलनात सहभागी होणार असून लवकरच हे आंदोलन तीव्र स्वरूप घेणार आहे असे काँग्रेसने कळवले आहे.
कर्नाटकातील भाजप सरकारच्या विरोधात जनजीवन असंतुष्ट होत आहे याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे. या प्रयत्नात त्यांना कितपत यश येते अद्याप समजलेले नाही. मात्र भाजप सरकारची गोची करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करणार आहे.