Tuesday, December 24, 2024

/

हतबल येडिं बरोबर पूरग्रस्त ‘जनताही ठरतेय येडी’

 belgaum

केंद्र सरकारकडे 30 हजार कोटीचे नुकसान दाखवून नुकसानीची भरपाई मागणारे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा सध्या हतबल ठरले आहेत.कर्नाटक विधानसभेचे बेळगावचे अधिवेशन रोखून त्याचा पैसा पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला आहे. केंद्राचे अधिकारी आणि मंत्री येऊन गेले पण त्यांनी राष्ट्रीय आपत्ती घोषित करून कर्नाटकातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याकडे पाठ फिरवल्यामुळे भाजपच्या सरकारचेच मुख्यमंत्री असलेल्या येडियुरप्पा यांच्या मंत्रीमंडळाची हतबलता वाढली आहे.

या हतबलते मुळेच की काय त्यांनी बेळगावात यावर्षी होणारे हिवाळी अधिवेशन रद्द केलं आहे निमित्त मात्र पूर ग्रस्तांच पुढं केलं आहे.बेळगावात जर अधिवेशन घेतलं तर पुरात नुकसानभरपाई न मिळालेले शेतकरी आणि विरोधक सरकारची कोंडी करू शकतात त्यामुळं त्यांनी हे बेळगावातल प्रस्तावित हिवाळी अधिवेशन रद्द केलंय असं राजकीय जाणकार मानतात.

SUvarna soudha

विरोधी पक्ष सक्षम नसले तरी त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या केंद्रातील भाजपकडून भरपाई का आणले नाही? या मुद्द्यावर विरोधकांनी रान पेटवले आहे.काँग्रेसचे प्रमुख नेते सिद्धरामय्या, जेडीएस चे प्रमुख नेते कुमारस्वामी आणि इतर नेत्यांनी येडियुरप्पा यांच्या बद्दल उघडपणे बोलण्यास सुरुवात केले आहे. खरोखरच येडींना हतबल करण्यात केंद्रातील भाजपचे नेते कारणीभूत आहेत. केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा यांना येडियुरप्पा यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदावर बसवायचे नव्हते, पण त्यांना ते बसवावे लागले.

आता नैसर्गिक आपत्ती घोषित करुन भरपाई रक्कम जमा केली तर गृहमंत्री अमित शहा यांच्या पेक्षा नायकाच्या भूमिकेत येडीयुरप्पाच येतील अशी काहीतरी भीती त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी केंद्रातून नुकसानभरपाई दिली नसावी .अशी चर्चा भाजपच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केंद्रातील राजकारण पेटले आहे.

मागे एकदा बोलता बोलता कर्नाटकातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री कोण तर येडी युराप्पा असे स्वतः येडी युराप्पा बाजूला बसलेले असतानाच अमित शहा यांनी विधान केले होते, आणि त्यानंतर आपण चुकलो असे सांगत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री सिद्धरामय्या अशी चुकीची दुरुस्ती करून घेतली होती.पण त्यांच्या डोक्यात येडी युराप्पा भ्रष्ट माणूस आहे हे बसले असावे असे त्यावरून वाटत असून आता त्यांच्या कृतीतून ही ते दिसून येत आहे .

खरे तर कर्नाटक राज्यातील भाजपला बळकट करण्यासाठी केंद्राने लागलीच मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार नुकसानभरपाई देण्याची गरज होती. पण मुख्यमंत्र्यांनी मागणी करूनही आणि स्वतः पाहणी करून ही नुकसानभरपाई मिळत नसल्यामुळे खरोखरच कर्नाटकातील भाजप नेते हतबल झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी उद्योजक व्यापारी सरकारी नोकर त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. कर्नाटकात आलेल्या पुराने साठ हजार कोटीपर्यंत चे नुकसान केल्याची आकडेवारी मिळत आहे किमान तीस हजार कोटी केंद्राने दिले तर पूर परिस्थिती सांभाळण्यात कर्नाटका ला यश येऊ शकणार आहे. पण कर्नाटकातील भाजपला केंद्रातील भाजप सहकार्य करत नसल्यामुळे सर्वात मोठी गोची झाली आहे आणि त्यांच्या पाठोपाठ पूरग्रस्त जनता येडी बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.