मंगळवारी सकाळी कॅन्टोन्मेंट ची बोर्ड मिटिंग झाली.डी लिमिटेशन अर्थातवॉर्ड पुनर्रचना करावी की नाही यावर चर्चा झाल्यानंतर सर्व सदस्यांनी सर्व वॉर्ड रचना करा अशी मागणी केली व ती मान्य केली असुन याबद्दलचा ठराव करण्यात आला आहे.
हा वार्ड पुनर्रचनेचा प्रस्ताव कॅटोंमेंट मुख्यालयात पाठवण्यात आला आता नवीन निवडणुकी पूर्वी कॅटोंमेंट बोर्डाचे वार्ड देखील रचनेत असणार आहेत. सध्या असलेल्या सदस्यांचा अवधी अजून चार महिने असून कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक जानेवारी नंतर होणार आहे.
दरम्यान या बैठकीत देखील हेस्कोमच्या थकीत बिलाचा विषय आलाच नाही.बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर गोविंद कलवाड, उपाध्यक्ष विक्रम पुरोहित, सदस्य साजिद शेख निरंजना अष्टेकर साजिद शेख रिजवान बेपारी अलादीन किल्लेदार मदन डोंगरे,
कर्नल पद्मिनी श्रीनिवास कर्नल बि आर चेतन लेफ्टनंट कर्नल नितींनकुमार उपस्थित होते.