बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघाता नंतर दोन्ही गाडया जळून खाक झाल्याची घटना बेळगाव गोवा चोरला रोड वर कालमनी जवळ घडली आहे.सोमवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास ही घटना घडली असून सदर बस पणजीकडून दूडंरगी कडे जात होती.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या घटनेमध्ये चार प्रवासी भाजून किरकोळ जखमी झाले आहेत रात्रीची वेळ असल्याने बस मध्ये मोजकेच प्रवासी प्रवास करत होते त्यामुळे बस मध्ये आगीचा भडका उडाला तरी चेंगराचेंगरी झाली नाही मोठी दुर्घटना टळली.अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर बस गोव्याकडून बेळगावकडे येत होती सोमवारी रात्री आठ वाजता ती गोव्याहून बेळगावकडे निघाली होती रात्री साडेबाराच्या सुमारास कालमनी क्रॉस जवळ बेळगाव कडून गोव्याकडे जाणाऱ्या ट्रक आणि बस मध्ये अपघात झाला या घटनेत ट्रकची डिझेलची टाकी फुटल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता.चालकांनी वाहकांनी बस मधून उतरून प्रवाश्यांना सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
घटनास्थळी लागलीच जांबोटी पोलिसांनी धाव घेतली होती त्यानंतर एक वाजता खानापुर पोलीस अधिकारी व अग्निशामक दल देखील या ठिकाणी दाखल झाले मात्र पोलिस येईपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. मंगळवारी सकाळी दोन्ही वाहने बाजूला करून ट्राफिक सुरू करण्यात आली यावेळी शेकडोंच्या संख्येने हा अपघाताने जळालेली वाहने बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली.