भारत देशात लाखों लोकांच्या आयुष्यात दृष्टी नसल्यामुळे अंधकार पसरला आहे जर त्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने मृत्यूनंतर नेत्रदान करणे गरजेचं आहे म्हणुन नेत्रदान आणि देहदानाचे महत्व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणु किल्लेकर यांनी व्यक्त केले, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये नेत्रदान जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष सुनिल भोसले, स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, सचिव प्रदीप चव्हाण,शनिवारखुट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री राजु गरडे , संजय पाटील आय फौंडेशनचे अध्यक्ष शिवराज पाटील उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आलेनंतर रेणु किल्लेकर आणि राजु गरडे यांच्या हस्ते जनजागृती फलकाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शिवराज पाटील, सुनिल भोसले यांनीही आपले विचार मांडले. राजु गरडे यानी जायंट्सच्या उपक्रमाचे कौतुक करून संघटनेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर यांच्या सौजन्याने हा उपक्रम पार पडला.यानंतर चनम्मा सर्कल येथील गणेश मंदिर, धर्मवीर संभाजी चौक, नरगुंदकर भावे चौक, रामलिंगखिंड गल्ली, एसपीएम रोड या ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले.याप्रसंगी जायंट्स मेनचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.