पश्चिम घाटात विसावलेल्या दूध सागर धबधब्याचे आकर्षण मोठे आहे. अनेकांना इच्छा होती पण रेल्वे विभागाने या ठिकाणी रेल्वे थांबवणे बंद केल्यामुळे आणि वनविभागाने दूध सागर धबधबा पाहण्यास बंद केल्यामुळे अनेकांची निराशा होत होती. आता नैऋत्य रेल्वेने एक्सप्रेस सुरू केली आणि एक्सप्रेस दुध सागर धबधबा अशा ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता दूध सागर धबधबा पाहणे सोपे होणार आहे.
प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार शनिवारी बेळगाव वास्को एक्सप्रेस धावणार आहे. बेळगाव ते वास्को किंवा वास्को ते बेळगाव असा प्रवास करताना दूध सागर धबधब्याच्या ठिकाणी एक्सप्रेस थांबणार असून त्यावेळी या धबधब्याचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.
या धबधब्याच्या ठिकाणी अनेक चुकीचे प्रकार घडलेले आहेत, अनेक दुर्घटना घडल्या त्यामुळे धोकादायक धबधबा बंद करण्यात आला होता.
तेथे थांबल्यास कारवाई करण्यात येत होती पण प्रशासनाने दोन पावले मागे घेऊन हा धबधबा पाहण्याची संधी दिल्यामुळे पर्यटकांची सोय होणार आहे.