नंदीहळ्ळी ते गर्लगुंजी व्हाया कोकण्याची व्हाळ हा रस्ता नंदीहळ्ळी जवळ खचला आहे. हा प्रमुख रहदारीचा रस्ता बेळगाव ग्रामीण मतदारसंघातला असून हा रस्ता बनवताना झालेला भ्रष्टाचार उघडकीला आला आहे.
या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात ही घटना आली. सध्या अर्धा रस्ता खचला आहे तर उरलेला अर्धा रस्ता कधीही खचण्याची भीती आहे.या रस्त्यावर होणारी बस व चार चाकी वाहतूक देखील बंद झाली आहे.बेळगाव ग्रामीण भागात हा रस्ता येत असून कोणत्याच लोक प्रतिनिधीनी या रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही.बेळगाव ग्रामीण भागातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
हा रस्ता बनवताना भर घालण्याच्या नावाखाली पैसे खाल्ले असल्याचा आरोप होत आहे. हा रस्ता खचला तरी स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांनी अजून लक्ष दिले नाही. याबद्दल नागरिक संतापले आहेत. उशीर झाल्यास पूर्ण रस्ता खचणार असून लवकर लक्ष देण्याची मागणी आहे.
बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे त्यामध्ये हा एक प्रमुख रस्ता असून त्या प्रकारच्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे ग्रामीणचे आमदार आणि लवकरात लवकर लक्ष देऊन या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे