बेळगाव जिल्ह्यातील राजकारणावर वर्चस्व असलेल्या गोकाक मधल्या जारकीहोळी बंधू मधला कलगीतुरा चालूच असून दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे काँग्रेस सोडून भाजपा वासी होण्याच्या मार्गावर असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि सतीश जारकीहोळी दोघांनी पुन्हा एकमेकांवर बोचरी टीका केली आहे.
रमेश जारकीहोळी यांनी सतीश जारकीहोळी यांचं डोकं ठिकाणावर नाहीये म्हणून ते वाट्टेल ते बडबडत चाललेत असा टोला लगावत राज्य सरकार माझ्यामुळे नव्हे तर देशातील केंद्रातील आणि राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमुळे पडले असा वक्तव्य केलय. त्याला सतीश जारकीहोळी यांनी देखील उत्तर दिलंय.
काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावाल तर खबरदार.. सतीश यांचा इशारा
शुक्रवारी रात्री अंकलगी येथे गोकाक ग्रामीण काँग्रेस अध्यक्षांवर रमेश जारकीहोळी यांचे जावई आंबिरराव पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला केलाय असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय याची चौकशी करण्या बाबत सतीश जारकीहोळी आणि लखन जारकीहोळी यांनी पोलीस स्थानकाला भेट दिली.
काँग्रेस कार्यकर्त्यां वरील हल्ले खपवून घेणार नाही गरज पडल्यास कायदा हातात घेऊ इथून पुढे अश्या घटना घडल्यास पोलीस स्थानका समोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय. इथून पुढे जर का काँग्रेस कार्यकर्त्यांना टार्गेट केले तर मी स्वतः समोर मारायला लावीन समोर कुणीही असेल त्याचा विचार करणार नाही ती ताकत माझ्यात आहे असा देखील इशारा दिलाय.
गोकाक विधानसभा मतदारसंघात जारकीहोळी बंधूंच्या वादात अनेक सामान्य माणसांना याचा फटका बसत आहे जस जशी निवडणूक जवळ येईल त्याची झळ आणखी वाढणार आहे