नुकतीच पूर येऊन गेल्यानंतर पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी अनेकांना धीर देत स्वबळावर उभे करत प्रशासन अधिकारी प्रशासन आणि संस्था कार्यरत आहेत. असे असले तरी पूर आलेल्या गावांमध्ये चाराटंचाई अजूनही कायम आहे. यामुळे अनेकांना मोठे संकट ठाकले आहे.
मागील वेळी झालेल्या पुराची दाहकता संपली असली तरी नव्याने उभे ठाकलेल्या आव्हानांना तोंड देत शेतकरीवर्ग कामाला लागला आहे. मात्र अजूनही सुरू असलेल्या पावसामुळे हाय अलर्ट करण्यात आली आहे. हे सारे खरे असले तरी शेतकऱ्यांच्या शेतात असणारे हत्ती गवत, काळे गवत, मका आणि इतर चारा पुराच्या पाण्यात कुजून गेला आहे. नदीकाठावरील ऊस पूर्णता वाया गेला आहे. त्यामुळे या पिकांचा उग्र वास सुटला आहे. हे पीक जनावरांना घालने म्हणजे धोकादायकच बनले आहे. त्यामुळे चारा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.
सगळं पुराच्या पाण्यात पुर्णता बुडालेल्या गवत तसेच उसावर मातीचा थर असून पाने करपू लागली आहेत. त्यामुळे उसाच्या पाल्याला देखील दुर्गंधी येऊ लागली आहे. जनावरे हा चारा खात नाहीत. जनावरांच्या चाऱ्यासाठी पावसाळ्यात चाऱ्याची सोय म्हणून भाताचे पिंजर, वाळलेले गवत रचून ठेवले होते. काही घरात चारही भरून ठेवण्यात आला होता. मात्र पुरामुळे चारा पूर्णतः वाया गेल्याने अनेकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने चारा पुरवठा करण्यावरही भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही शेतकऱ्यांनी तर चारा मिळत नसल्यामुळे उभा ऊस तोडून घालण्यास सुरुवात केली आहे. तर काही गावात जनावरांना चारा म्हणून घालण्यासाठी उसही शिल्लक राहिला नाही. अशी परिस्थिती सध्या आहे त्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महिलांवरील जाऊन ते आणावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने चारा पुरवठा करण्यावरही भर द्यावा अशी मागणी होत आहे.