बेळगाव शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊन घरे पडण्याच्या घटनेला एक महिना उलटला आहे. मागच्या महिन्याच्या 7 ऑगस्टला या दुर्दैवी घटना घडल्या होत्या .त्या घटनात बेळगाव शहरात वेगवेगळ्या भागात घरे पडून नुकसान झाले. या नुकसान झालेल्या नागरिकांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. एक महिना झाला हे लोक वाट बघत आहेत .शहरातील नाले ओव्हर फ्लो उपनगरात पाणीच पाणी या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे मात्र शासनाकडून पुरग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही.
काही ठराविक व्यक्ती वगळता इतरांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. बेळगाव महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे .जीपीएस द्वारे सर्वेक्षण करूनच नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना सरकारकडून आल्यामुळे बेळगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे सर्वेक्षण होईपर्यंत साहित्य काढू नका अशी सूचना घरे पडलेल्या नागरिकांना केली .त्यामुळे सध्या जोरात पाऊस सुरू आहे साहित्य अडकून पडले आहे आणि हे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी आहे.
मागच्या महिन्यात सात ऑगस्टला दुर्घटना घडल्या होत्या. सात सप्टेंबर आला तरी नुकसानभरपाई मिळत नाही. याचे कारण काय सरकारला गरिबांची किंमत आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. कर्नाटक मध्ये भाजपचे सरकार आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. मात्र कर्नाटक सरकारचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केलेल्या नुकसानभरपाईची मागणी कडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी भेट दिली. केंद्राचे एक पथक येऊन गेले पण अजूनही नुकसानभरपाई देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसान झालेल्या लोकांनी काय करायचे असा प्रश्न आहे.
याबद्दल लवकरात लवकर उपाय काढावा ही मागणी आहे.