मध्यवर्ती बस स्थानकाचे सुरू असलेले बांधकाम गेल्या पन्नास दिवसापासून ठप्प झाले आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या जमिनीवर विना परवानगी बांधकाम केल्याचा आक्षेप घेतल्यामुळे सदर काम ठप्प झाल्याची माहिती उजेडात आली आहे.स्मार्ट सिटी योजने अंतर्गत हे काम सुरू होते.
कॅन्टोन्मेंटचा दावा आहे की छावणी मंडळाची काही जमीन त्यांच्या परवानगीशिवाय प्रकल्पासाठी वापरन्यात आली आहे. मागील 50 दिवसांपासून तेथे कोणतेही काम चालू नाही. कारण कॅन्टोन्मेंटने स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना जमिनीचा वाद मोकळा करण्यास सांगितले होते. मात्र हा वाद अजूनही मिटविण्यात आला नाही. त्यामुळे अजूनही या कामाला गती मिळालेली नाही.
सिटी बसस्थानक 2.07 एकरमध्ये बनविण्यात येत आहे. त्यापैकी काही गुंठे जमीन कॅन्टोन्मेंट मालकीची असून त्यांच्याकडून कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही. यामुळे हे काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बस स्थानकाच्या कामाला कॅन्टोन्मेंट बोर्डाने आक्षेप घेतला असून बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने आपल्या 32 गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. आता हा प्रकल्प जमिनीच्या वादात अडकला आहे. त्यामुळे कामाला कधी सुरुवात होणार याकडे लक्ष लागले आहे.
अपूर्व कन्स्ट्रक्शन्स, तुमकुरने बेलागाव शहरातील सिटी बस टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी 32.26 कोटी रुपये खर्च केले आहेत. स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत बसस्टँडला नवीन दर्शनी, वेटिंग रूम, कारसाठी बेसमेंट पार्किंग आणि स्कायवॉक अशा विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
तळघरा मध्ये 133 कार आणि 51 दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा आहे .बस स्थानकात स्वतंत्र दुचाकी पार्किंगची सुविधा आहे. बस टर्मिनससाठी सबवे कनेक्शन, लोअर ग्राऊंड फ्लोअरमध्ये 28 बस पार्किंग,
अप्पर ग्राऊंड फ्लोअरमध्ये तळघर आणि मुख्य प्रतीक्षा क्षेत्रात दुकाने आणि एस्केलेटरसह वाहनांची नोंद असेल.
प्रथम आणि द्वितीय मजल्यामध्ये एनडब्ल्यूकेआरटीसी कार्यालयासाठी व्यावसायिक जागा आहे.
तिसरा मजला आणि टेरेसकडे व्यावसायिक जागा असणार आहे.