बेळगाव शहरात अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे सेवा बजावतात. अशाच एका प्रामाणिक रिक्षाचालकाचे सध्या कौतुक होत आहे.
संदीप श्रीकांत पवार असे रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याच्या रिक्षामध्ये वंदना विनायक पवार ही महिला बसली होती. रिक्षातून उतरून जाताना त्या रिक्षामध्ये बॅग विसरल्या. त्यामध्ये 3900 रुपयांचा मोबाईल आणि काही रोख रक्कम होती .
शोध घेण्याचा प्रयत्न संदीप पवार यांनी केला पण ती सापडली नसल्यामुळे खडेबाजार पोलिसांशी संपर्क साधण्यात आला होता. ती महिला सापडताच पोलिसांच्या उपस्थितीमध्ये मोबाईल परत देण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षाचालक संदीप पवार यांचे कौतुक होत आहे .
रिक्षा चालकांबद्दल अनेक वाईट अनुभव येतात. पण रिक्षाचालक प्रामाणिक आहेत आणि ते चांगली सेवा करतात असे समजले की समाजातून त्यांचे कौतुक केले जाते.